VishwaRaj

ड्रॉलइंग - तोंडामधून लाळ गळण्याच्या समस्येची काळजी मी कधी करावी?

ड्रॉलइंग म्हणजे तोंडा मधून लाळ गळणे. नाक, कान, घसा आणि मज्जासंस्थेच्या असंख्य विकारांचे हे एक सामान्य लक्षण आहे. लहान मुल किंवा नवजात शिशु च्या तोंडामधून लाळ गळत असेल तर ते अतिशय सामान्य आहे कारण हे मुलांमध्ये दात येण्याचे चिन्ह आहे. शिवाय, त्यासाठी काळजी करण्याची गरज नाही. परंतु, जेव्हा हे प्रौढ लोकांमध्ये आढळते किंवा त्याचे कारण जर अस्पष्ट असेल तर हे काळजीचे कारण आहे.

🔹 तोंडामधून लाळ गळण्याची कारणे (सिलोऱ्हिया ):
मुख्यत्वे जेव्हा तोंडामध्ये अति प्रमाणात लाळ तयार होते तेव्हा ती गळण्या सुरुवात होते. लाळ गळण्याची काही कारणे खालील प्रमाणे :

  • घसा बसणे,
  • टॉन्सील्स मध्ये सूज येणे
  • नाकाच्या आतील पोकळीमध्ये अडथळा असणे
  • एलर्जी असणे
  • सायनसेस मध्ये सूज येणे
  • ऍनाफीलॅक्सिस
  • गरोदरपण
  • मोनोन्युक्लिओसिस
  • स्ट्रेप थ्रोट – घशाचा जंतुसंसर्ग
  • ऑटिझम
  • स्नायूंची विकृती
  • गलग्रंथिच्या सभोवती गळू होणे
  • इपीग्लॉटीसला सुज येणे
  • रेट्रोफॅरेनजीयल – घशाच्या मागील बाजूस गळू होणे
  • डाउन्स सिंड्रोम
  • गॅस्ट्रोइसोफेजीयल रिफ्लक्स डिसीज (जी इ आर डी )
  • पार्किंसन डिसीज
  • मल्टिपल स्क्लेरॉसिस
  • सेरेब्राल पाल्सी
  • स्ट्रोक
  • अमायोट्रॉफीक लॅटरल स्क्लेरॉसिस (ए एल एस )
  • डेंटल मोनोन्यूक्लीऑसीस
  • हायपरइमेसीस ग्रॅव्हीडॅरम
  • काही प्रकारची औषधे

▪️तोंडामधून लाळ गळणे हे केव्हा काळजी करण्यासारखे बनते?

जर लहान मुले किंवा नवजात शिशु यांच्या तोंडामधून लाळ गळत असेल तर ते अतिशय सामान्य आहे. परंतु, जर तुम्ही अतीप्रमाणात लाळ गळण्याच्या त्रासाने त्रस्त असाल तर वैद्यकीय मदत घेणे अतिशय महत्वाचे आहे.
जर तुम्हाला खाली दिलेल्या समस्यां पैकी कोणतीही समस्या असेल तर तुम्ही डॉक्टरांचे समुपदेशन घेऊ शकता.
– जर तोंडामधून लाळ गळणे अचानक सुरु झाले तर
-अतीप्रमाणात येणाऱ्या लाळे मुळे गुदमरल्या सारखे किंवा तोंडामध्ये काहीतरी कोंबल्या सारख्या संवेदना होणे
-ही समस्या जर मुलांमध्ये दात येण्याशी संबंधित नसेल तर
-ताप येत असेल किंवा मुलांमध्ये श्वास घेण्यास काही समस्या येत असतील तर
-लाळ गळण्याचे कारण माहित नसेल किंवा अस्पष्ट असेल तर
-जेव्हा लाळ गळण्याची समस्या ही इतर लक्षणां बरोबर त्वरित गंभीर बनली असेल तर. ओठांवर, जिभेवर आणि चेहऱ्यावर सुज येणे, तसेच श्वास घेण्यामध्ये त्रास होणे ही लक्षणे आहेत का ते तुम्ही तपासू शकता.

लक्षात ठेवा अशा समस्यांना दुर्लक्षित करणे हे अतिशय हानिकारक ठरू शकते. शेवटी, गुदमरल्या सारखे होणे किंवा अस्पीरेशन – श्वासावरोध सारख्या गुंतागुंतीच्या समस्या उद्भवू शकतात.

▪️तोंडामधून लाळ गळण्याच्या समस्ये साठी उपचार पद्धती :

तोंडामधून लाळ गळण्याच्या समस्ये साठीचे उपचार हे त्या व्यक्तीच्या वयावर आणि याचे कारण काय आहे यावर अवलंबुन असते. जर 4 वर्षा खालील लहान मुलांमध्ये लाळ गळत असेल तर डॉक्टर तुम्हाला साधा उपाय सांगतात की फक्त दात येताना घ्यावयाची काळजी घ्या. जेव्हा ही समस्या अतिशय गंभीर बनेल तेव्हा उपचार केले जातात. उदाहरणार्थ, जर लाळ तोंडामधून कपड्यांवर पडत असेल किंवा त्यावर तुमचे नियंत्रण राहिले नसेल तर डॉक्टर तुम्हाला यावर काही उपचार पद्धती सुचवतील. परंतु, या उपचार पद्धती प्रत्येक व्यक्ती नुसार वेगवेगळ्या असतील. या साठी डॉक्टर काही रोगनिदानसूचक तपासण्या करून घेतील आणि नंतर उपचार पद्धतीचा आराखडा आखतील.

बहुतांश रुग्णांमध्ये, लाळ गळण्यास कारणीभूत असलेल्या आजारावर उपचार केल्यास समस्या सुटण्यास मदत होते. उदा. जर कारण टॉन्सिल्स ची सुज असेल तर, टॉन्सिल्स काढल्यावर किंवा त्याची सुज कमी केल्यास लाळ गळणे आपोआप बंद होते.

परंतु, काही रुग्णांमध्ये जे कारण असते ते बरे होण्या सारखे नसते. जेव्हा असे घडते तेव्हा लाळेचे तयार होण्याचे प्रमाण कमी करण्यासाठी डॉक्टर औषधे देतात.

तुम्ही साखर असलेले पदार्थ खाणे सुद्धा कमी करू शकता. याबरोबर, तुम्ही गळलेली लाळ स्वछ आणि कोरड्या कपड्याने पुसत आहात याची खात्री करत रहा.

लाळ गळणे हा लहान मुलांचा विकास होण्याचा भाग आहे. परंतु, अति प्रमाणामध्ये लाळ तयार होणे किंवा त्या बरोबर असलेली इतर लक्षणे यांना त्वरित वैद्यकीय उपचारांची आवश्यकता असते. लाळ गळण्याला कारणीभूत असणारे बरेच आजार आहेत. त्यामुळे, डॉक्टरांना भेटणे हे योग्य रोगनिदान होण्या साठी मदतीचे ठरेल. लाळ गळण्याची समस्या ही काही औषधे आणि काही उपचार पद्धतींनी सहज बरी होऊ शकते. या समस्ये पासून बरे होण्यासाठी तुम्ही फक्त वैद्यकीय तज्ञांनी दिलेला सल्ला कठोरपणे पाळला पाहिजे.

संबंधित पोस्ट