VishwaRaj

मधुमेहा मुळे दाताच्या समस्या निर्माण होतात का?

मधुमेह असलेल्या रुग्णांच्या तोंडामध्ये जंतू निर्माण होण्याची शक्यता जास्त प्रमाणात असते. त्यामुळे दातांवर परिणाम होण्याची शक्यता देखील मोठ्या प्रमाणात वाढते. जर तुम्ही तुमच्या मधुमेहावर नियंत्रण ठेवत नसाल, तर रक्तामधील पांढऱ्या पेशींची संख्या कमी होईल आणि शरीराची स्वतःची सुरक्षा प्रणाली कमकुवत बनेल. त्यामुळे, तुम्ही दात, हाडे आणि हिरड्या यांच्या जंतुसंसर्गाने त्रस्त व्हाल. हिरड्यांचा रक्तप्रवाह कमी होऊन त्यांचे विकार उद्भवण्या मागे मधुमेह हे सुद्धा एक कारण आहे.

🔹 तोंडाच्या आरोग्यावर झालेला परिणाम दर्शवणारी लक्षणे :
जर तुम्हाला खाली नमूद केलेली लक्षणे नियमितपणे दिसून येत असतील तर दंतचिकित्सा तज्ञांचे समुपदेशन घेणे उत्तम ठरेल.
▪️ वारंवार जंतुसंसर्ग होत असेल
▪️ रक्तस्राव वाढला असेल आणि हिरड्यांना सूज असेल
▪️ 24 तास तोंडाला दुर्गंधी असेल आणि तुम्ही त्याच्यापासून सुटका करून घेऊ शकत नसाल

🔹 मधुमेहा बरोबर असलेल्या दातांच्या इतर समस्या:
जर तुम्हाला अनियंत्रित मधुमेह असेल तर तुम्हाला खालील समस्या होण्याच्या शक्यता अधिक आहेत.
▪️ कोरडे तोंड:
अनियंत्रित मधुमेहामुळे तोंडा मध्ये लाळ तयार होण्याचे प्रमाण कमी होते त्यामुळे तोंड कोरडे पडते. कोरडे तोंड दात किडणे, आंबटपणा, अल्सर्स आणि जंतूसर्ग यांना कारणीभूत ठरतो.

▪️तोंडामधील टिश्यु लवकर बरे होत नाहीत:
मधुमेह असलेल्या लोकांमध्ये रक्तामधील पांढऱ्या पेशींचे उत्पादन हे कमी प्रमाणामध्ये होते त्यामुळे दातावरील शस्त्रक्रिये नंतर तोंडामधील टिशू लवकर बरे होत नाहीत. याच बरोबर, रक्त प्रवाहामध्ये देखील अडथळे निर्माण होतात त्यामुळे बरी होण्याची प्रक्रिया अतिशय मंद गतीने होते.

▪️ हिरड्यांचा जंतुसंसर्ग :
मधुमेह हा रक्तवाहिन्यांना जाड बनवून समस्या निर्माण करतो, त्यामुळे शरीरामधील टीश्यूना पोषण घटकांचा पुरवठा कमी प्रमाणामध्ये होतो. याचबरोबर, शरीरामधील टाकाऊ पदार्थांचा शरीरामधील पेशी मधून बाहेर पडण्याचा प्रवाह खंडित होतो ज्यामध्ये तोंडाचा देखील समावेश असतो. त्यामुळे या दोन्ही समस्या जेव्हा एकत्रितपणे निर्माण होतात तेव्हा शरीराची सुरक्षा प्रणाली ही जंतुसंसर्गाचा सामना करण्यास असमर्थ ठरते. हिरड्यांना सूज येणे हा जिवाणूंचा जंतुसंसर्ग आहे, मधुमेह असलेल्या व्यक्तीला वारंवार हिरड्यांचे आजार होतात.

▪️ थ्रश:
जंतुसंसर्गाचा सामना करण्यासाठी, मधुमेह असलेल्या व्यक्तीला वारंवार अँटिबायोटिक्स घ्यावे लागतात त्यामुळे तोंडामध्ये बुरशीचा संसर्ग निर्माण होतो. ही परिस्थिती चिघळत जाते कारण लाळेमध्ये असलेल्या अति प्रमाणातील ग्लुकोज मुळे बुरशीची वाढ मोठ्या प्रमाणामध्ये होते. शिवाय, मधुमेह असलेली व्यक्ती जर नियमितपणे कवळी वापरत असेल तर त्यामुळे बुरशीचा संसर्ग होतो.

▪️ जीभ आणि तोंडामध्ये जळजळ होणे :
तोंडामध्ये थ्रश असल्यामुळे ही परिस्थिती निर्माण होते. मधुमेह असलेल्या ज्या व्यक्ती धुम्रपान करत असतील त्यांना दातांच्या समस्या होण्याच्या शक्यता 10 पटीने जास्त असतात. धूम्रपानामुळे हिरड्यांमधील रक्तप्रवाह खंडित होतो आणि दातां जवळील भागामधील आजार बरे होण्याची प्रक्रिया मंद होते.

🔹 तुम्ही दाताच्या समस्या कशा प्रतिबंधित करू शकता?

जेव्हा तुम्ही मधुमेह असलेली व्यक्ती असतात तेव्हा तुम्हाला तुमच्या दातां जवळील भागाची काळजी घेणे अत्यावश्यक आहे. या कारणासाठी, खाली दिलेल्या गोष्टी तुम्ही पाळाव्यात असे आम्ही सुचवतो :
▪️ दिवसातून किमान दोन वेळा दातांना ब्रश आणि फ्लॉज करावा
▪️ रक्ता मधील ग्लुकोजच्या पातळी वर नियंत्रण मिळवण्यासाठी शारीरिक हालचालींवर भर द्या.
▪️ जर तुम्ही धूम्रपान करणारे असाल तर, त्वरित ते बंद करा
▪️ तुमच्या डॉक्टरांना तुमच्या मधुमेहा बाबत सांगा, त्याचबरोबर त्यांच्या कडून हिरड्या आणि दातांच्या आरोग्यासाठी त्यांची कशी काळजी घ्यायची याबाबत चा आराखडा तयार करून घ्या.
▪️ दर 6 महिन्यांनी दातांची आरोग्य तपासणी करा

🔹 निष्कर्ष:
काही वेळा जेव्हा तुम्ही परिस्थिती नियंत्रणात आणत नाही, तेव्हा शस्त्रक्रिया करण्याची आवश्यकता पडते. त्यामुळे आरोग्य व्यवस्थित ठेवणे हे रोग बरा करण्यापेक्षा उत्तम ठरते. तुम्हाला सर्वात महत्त्वाचे पाऊल उचलायचे आहे ते म्हणजे तुमचा मधुमेह नियंत्रणात ठेवणे, बाकीचे सर्व ओघानेच येईल. तथापि, जर तुम्हाला काही समस्या असेल तर त्वरित डॉक्टरांचे समुपदेशन घ्या.

संबंधित पोस्ट