VishwaRaj

व्हिडिओचे वर्णन

श्री. दिलीप विठ्ठल गायकवाड आणि सौ. रूपाली दिलीप गायकवाड यांना 2019 मध्ये मुलगा झाला, प्रसूती झालेल्या दिवसानंतर, डॉक्टरांनी त्यांना बोलावले आणि बाळाला खाजगी हॉस्पिटल मध्ये नेण्यास सांगितले कारण बाळ सतत उलट्या करत होते.
त्या दोघांनी त्यांच्या बाळाला त्यांच्या घराजवळ असलेल्या खाजगी रुग्णालयामध्ये नेले आणि डॉक्टरांचे समुपदेशन घेतले. डॉक्टरांनी बाळाची संपूर्ण तपासणी केल्यानंतर बाळाला गुदद्वार आणि गुदाशयाची विकृती असल्याचे निदान केले. दुर्दैवाने, त्यांच्याजवळील भागामध्ये या विकाराचे उपचार उपलब्ध नसल्याने डॉक्टरांनी त्यांना पुण्यामधील हॉस्पिटल मध्ये जाण्याचा सल्ला दिला. त्याच वेळी, त्या जोडप्याने त्यांच्या बाळाला बऱ्याच डॉक्टरांना दाखवले परंतु बाळावर उपचार मिळविण्यास अयशस्वी झाले.

शेवटी, हे जोडपे उपचारांसाठी विश्वराज हॉस्पिटल मध्ये पोहोचले आणि डॉ. जयेश देसाळे यांचे समुपदेशन घेतले. हॉस्पिटल मधील कर्मचारी आणि तज्ञांना बाळाच्या परिस्थिती विषयी जसे कळाले तसे त्यांनी तात्काळ बाळावर उपचार सुरु केले व त्यास सलाईन लावले. दुसऱ्या दिवशी बाळावर यशस्वीपणे शस्त्रक्रिया करण्यात आली.

डॉ. जयेश देसाळे यांनी स्पष्ट केले की बाळाची परिस्थिती अतिशय गंभीर होती. बाळ फक्त 2 दिवसांचे होते आणि त्याला ‘ऍनोरेक्टल मालफॉर्मेशन’ नावाची विकृती होती ज्यामध्ये बाळाच्या गुदद्वाराची जागा पूर्णपणे बंद होती त्याला छिद्र नव्हते. डॉक्टरांनी सांगितले की त्यामुळे त्यांनी बाळाला त्वरित शस्त्रक्रिया साठी घेतले.

बाळाची शस्त्रक्रिया ही पूर्णपणे यशस्वी झाली आणि आता बाळ धोक्याच्या बाहेर व पूर्णपणे सुरक्षित आहे.

विश्वराज हॉस्पिटलची अगदी वेळे मधील उपचार सेवा आणि डॉ. जयेश देसाळे, बालरोग विभागा मधील शस्त्रक्रिया तज्ञ यांचे तातडीचे प्रयत्न यांमुळे दोन दिवसांच्या नवजात शिशु चे प्राण वाचवण्यात यश आले.

Related Videos