VishwaRaj

किडनी फेल्युअरच्या पायऱ्या काय आहेत?

बऱ्याच दिवसांपासून असलेल्या मूत्रपिंडाच्या आजाराच्या (क्रॉनिक किडनी डिसीज) 5 पायऱ्या असतात. पहिल्या पायरी मध्ये तुम्हाला थोड्या प्रमाणात वेदना होतात परंतु पाचव्या पायरी मध्ये मूत्रपिंड पूर्णपणे निकामी झालेले असते. तथापि, तुमच्या मूत्रपिंडाचे कार्य किती प्रमाणात सुरळीत चाललेले आहे यावरून पायऱ्या ठरतात. सुरवातीच्या पायरी मध्ये मूत्रपिंड हे रक्त गाळून शुद्ध करू शकते परंतु नंतर च्या पायरी मध्ये मूत्रपिंडाला टाकाऊ पदार्थ शरीरा बाहेर टाकणे शक्य होते नाही आणि नेहमी मूत्रपिंड त्याचे कार्य थांबवते.

🔹क्रॉनिक किडनी डिसीज (सी के डी)च्या 5 पायऱ्या :
ग्लोमेरूलर फिल्ट्रेशन रेट (किंवा जि एफ आर)चा अंदाज घेऊन डॉक्टर मूत्रपिंड किती प्रमाणात टाकाऊ पदार्थ फिल्टर करू शकते हे मोजतात. शिवाय, क्रीयाटीनीन चे प्रमाण, रक्तामधील टाकाऊ पदार्थांचे प्रमाण देखील जी. एफ. आर. शोधण्यासाठी मोजले जाते.

🔹 जी. एफ. आर. च्या प्रमाणावर क्रॉनिक किडनी डिसीज च्या पायऱ्या खालीलप्रमाणे:
▪️सी. के. डी. पायरी 1:
सी. के. डी. च्या पायरी 1 मध्ये तुमचा जी. एफ. आर. हा 90 किंवा त्या पेक्षा जास्त असतो. या पायरी दरम्यान तुमच्या आजाराची परिस्थिती मध्यम स्वरूपाची असते, त्यामध्ये तडजोड करणे आणि सहजपणे जुळवून घेणे शक्य असते. त्यामुळे, मुत्रपिंड त्याचे कार्य जवळपास 90 % किंवा त्यापेक्षा जास्त प्रमाणामध्ये करू शकते. या पायरी दरम्यान, जर तुम्ही नियमित करण्यात येणारी रक्ताची किंवा लघवीची तपासणी केली तरच तुम्हाला सीकेडी असल्याचे कळू शकते. किंवा मधुमेह व उच्चरक्तदाबा साठी जर तुम्ही रक्ताची आणि लघवीची तपासणी केली तर सीकेडी बदल कळू शकते. शिवाय, या पायरी दरम्यान सीकेडी ची कोणतीही विशिष्ट लक्षणे नसतात.

▪️सी. के. डी. पायरी 2:
सी. के. डी. च्या पायरी 2 मध्ये तुमचा जी. एफ. आर. हा 60 ते 89 असतो. मुत्रपींडाला हानी पोहोचल्याची लक्षणे तुम्ही अनुभवत असला तरीही या पायरी दरम्यान मूत्रपिंड त्याचे कार्य व्यवस्थित रित्या करत असते. यावेळी तुम्हाला तुमच्या लघवी मध्ये प्रथिनांचे प्रमाण उपलब्ध असल्याचे निदर्शनास येईल किंवा मूत्रपिंडाला हानी झालेली असेल.
इतर काही लक्षणे खालील प्रमाणे :
1) फिटिग
2) थकवा
3) झोपेच्या तक्रारी
4) खाज सुटणे
5) भूक कमी होणे

▪️सी. के. डी. पायरी 3:
किडनी फेल्युअर च्या 3 ऱ्या पायरी मध्ये अजून दोन भाग पडतात, पायरी 3A आणि पायरी 3B. पायरी 3A मध्ये तुमचा जी एफ आर हा 45 ते 56% इतका तर, पायरी 3B मध्ये 30 ते 44% इतका असतो. या पायरीमध्ये, तुमचे मूत्रपिंड टाकाऊ पदार्थ, पातळ पदार्थ आणि विषारी घटक फिल्टर करू शकत नाही. यामुळे हे टाकाऊ पदार्थ तुमच्या शरीरामध्ये साठवण्यास सुरुवात होते. शिवाय, खालील लक्षणे तुमच्या मध्ये उद्भवतात :
1) थकवा
2) पाठी मध्ये वेदना
3)फटीग
4) भूक न लागणे
5) झोपेच्या समस्या
6) हात आणि पायाची सूज
7) सतत खाज सुटणे

▪️सी. के. डी. पायरी 4:
पायरी चार म्हणजे किडनी फेल्युअर होय, जो आता अतिशय गंभीर बनलेले असतो. तुमचा जी एफ आर हा 15 – 29% एवढा असतो. त्यामुळे तुमचे शरीर जास्तीत जास्त टाकाऊ पदार्थ, पातळ पदार्थ आणि विषारी घटक साठवण्यास सुरुवात करते. या पायरी दरम्यान तुमच्या समस्येवर उपचार करण्यासाठी वेळे बाबत अतिशय उशीर झालेला असतो. काही अभ्यासांनुसार, खूप लोकांना या पायरीमध्ये पोहोचल्या नंतर देखील स्वतःला किडनीचा विकार आहे याची जाणीव नसते.

▪️सी. के. डी. पायरी 5:
या पायरीमध्ये तुमचा जी एफ आर हा 15% पेक्षा कमी असतो. काही परिस्थितींमध्ये, तुम्हाला पूर्ण:ह किडनी फेल झाल्याचा अनुभव येईल. या पायरी लाच शेवटच्या पातळीचा मूत्रपिंडाचा विकार असेही म्हणतात. या पायरी दरम्यान, शरीरामध्ये साठलेले विषारी घटक हे जीव घेणे आजार निर्माण करू शकतात.

▪️ निष्कर्ष:
किडनी फेल्युअर च्या सुरुवातीच्या पायऱ्या या मध्यम स्वरूपाच्या आणि सहजपणे जुळवून घेता येण्यासारख्या असतात त्यामुळे नियमितपणे आरोग्य तपासणी करणे अतिशय महत्त्वाचे आहे. तथापि, तुम्हाला जर काही लक्षणे जाणवत असतील, तर त्वरित वैद्यकीय तज्ञांचे समुपदेशन घेणे सर्वोत्तम ठरेल.

संबंधित पोस्ट