VishwaRaj

Video Description

How to Avoid Constipation During Pregnancy? | Dr. Kiran Shinde ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर माहिती देणार आहेत .

प्रेग्नेंसीमध्ये बध्दकोष्ठता (Constipation in Pregnancy) या संधर्भात Dr. Kiran Shinde – Gastroenterology and Therapeutic Endoscopist आपल्याला या video च्या माध्यमातून सविस्तर माहिती देणार आहेत.

गूडन्यूज मिळाल्यानंतर प्रत्येक स्त्री आपल्या होणाऱ्या बाळासाठी योग्य आहार आणि आरोग्याची अधिक काळजी घेऊ लागते. पण जस जसे दिवस महिन्यांमध्ये बदलतात तसतसे त्या स्त्रीला गरोदरपणात काही त्रासही होऊ लागतात. त्यापैकीच एक त्रास आहे तो म्हणजे ‘बद्धकोष्ठता’. बद्धकोष्ठतेचा त्रास साधारण पहिल्या 3 महिन्यामध्येच गरोदर महिलेला जाणवू लागतो. बद्धकोष्ठतेचा त्रास हा गरोदरपणात होणे हे स्वाभाविक आहे. Pregnancy plan करण्यापुर्वीच जरी constipation होत असेल तर आधी डॉक्टरांना भेटावे आणि मगच pregnancy plan करावी कारण काही आजार pregnancy पूर्वीच ओळखणे गरजेचे आहे.

प्रेग्नेंसीमध्ये constipation टाळण्यासाठी घरगुती उपाय (Home Remedies for constipation in pregnancy )
– High Fibre Diet असला पाहिजे.
High Fibre Diet मध्ये तुम्ही हिरवे पालेभाज्या, काकडी, गाजर, पपई, सफरचंद, sprouts हे आपल्या Diet मध्ये include केले तर constipation चे chances कमी होतात.जरी आपण पाणी कमी पीत असेल किंवा आपली हालचाल आणि व्यायाम कमी होत असेल किंवा जे पदार्थ high Fibre आहे ते पदार्थ जसे बटाटे, वांगी, गवार, साबुदाण्याची खिचडी आणि शेंगदाण्याचे कूट यांचे सेवन कमी करा.
– Pregnancy मध्ये Constipation टाळण्यासाठी High Fibre Diet घेणे, वेळेवर पाणी पिणे, तणाव मुक्त राहणे आणि व्यायाम करणे महत्त्वाचे आहे.

How to treat constipation during pregnancy?
Pregnancy मध्ये काही गोष्टी निदर्शनास आल्यावर त्वरित डॉक्टरांना भेटले पाहिजे उदाहरणार्थ संडासातून रक्त जाणे, वजन कमी होणे किंवा सतत पोटामध्ये दुखणे.Pregnancy मध्ये बद्धकोष्ठता commonly दिसू शकते तसेच Pregnancy झाल्यानंतर आणि डिलिव्हरी झाल्यानंतर सुद्धा बरेच महिलांना constipation होते.

Pregnancy नंतरची constipation (Postpartum Constipation)टाळण्यासाठी काय करावे?
(how to avoid constipation after delivery)
Home Remedies करणे खूप गरजेचे आहे. constipation होईल असे पदार्थ खाऊ नये. पाणी जास्त पिणे आणि नियमितपणे व्यायाम करणे खूप गरजेचे आहे तसेच तणावमुक्त राहणे गरजेचे आहे.

अधिक माहितीसाठी पूर्ण विडिओ पहा .

काही प्रश्न असल्यास, आम्हाला लिहा : info@vrhpune.com
आम्ही आपल्या सर्व प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करू.

Related Videos