VishwaRaj

तुम्ही तुमचे मूत्रपिंड आरोग्यदायी कसे ठेवता?

मूत्रपिंड हे शरीराची बरीच महत्वाची कार्ये पार पडते उदाहरणार्थ, शरीरामधील अधिक प्रमाणातील टाकाऊ पदार्थ बाहेर काढणे, रक्तामधील अशुद्ध घटक आणि अधिक प्रमाणातील पाणी बाहेर काढणे. शरीर प्रथम हे सर्व टाकाऊ पदार्थ मूत्राशयाच्या पिशवीमध्ये साठवते, आणि नंतर ते लघवी मार्फत शरीरा बाहेर टाकते. शिवाय, मूत्रपिंड शरीराची पी. एच. ची पातळी, पोटॅशियम ची पातळी आणि शरीरातील मिठाचे योग्य प्रमाणात राखते. रक्ता मधील पेशींच्या पातळीवर नियंत्रण ठेवणाऱ्या संप्रेरकाची – हार्मोनची निर्मिती मूत्रपिंड करते.

त्यामुळे, अशा महत्वाच्या शारीरिक प्रक्रिया अमलात आणण्या साठी, तुम्हाला तुमच्या मूत्रपिंडाची काळजी घेणे अतिशय गरजेचे आहे. मूत्रपिंडाला आरोग्यदायी ठेवून, तुम्ही नियमितपणे शरीरा मधील टाकाऊ पदार्थ फिल्टर करू शकता आणि इतर कार्ये अगदी सहजतेने पार पाडू शकता.

🔹 तुमच्या मूत्रपिंडाला आरोग्यदायी ठेवण्या साठी काही महत्त्वाच्या टिप्स :
तुम्ही तुमचे मूत्रपिंड कसे आरोग्यदायी ठेवू शकता त्यासाठीचे काही मार्ग खाली नमूद केलेले आहेत

▪️ नियमित व्यायाम:
नियमित शारीरिक व्यायाम हा योग्य वजन राखण्यास मदत करतो आणि उच्च रक्तदाबाची समस्या बरी करतो. परंतु तुम्ही करत असलेल्या व्यायाम प्रकारांच्या तीव्रते कडे जरा लक्ष द्या आणि कोणत्याही प्रकारच्या तणावाखाली न करता तो प्रमाणामध्ये करा. अशा प्रकारे, तुम्ही जर शारीरिक दृष्ट्या उत्तम परिस्थिती मध्ये नसाल आणि व्यायाम करण्यासाठी स्वतःवर दबाव आणत असाल तर, तुम्ही खूप मोठ्या समस्या निर्माण करत आहात.

तथापि, जर तुम्ही अति धोक्याच्या हृदयविकाराने ग्रस्त असाल तर तुम्हाला जास्तीच्या काळजीची आवश्यकता आहे. जर तुम्ही अति धोक्याच्या हृदयविकाराने ग्रस्त असाल तर सकाळी चालण्या साठी जा किंवा तज्ञांचे समुपदेशन घ्या. वैद्यकीय तज्ञ तुम्हाला योग्य व्यायाम प्रकारां बद्दल उत्तम मार्गदर्शन करतील.

▪️हायड्रेटेड रहा :
जर तुम्ही हायड्रेटेड राहात असाल तर ते अतिशय उत्तम आहे याचा अर्थ योग्य प्रमाणामध्ये पाण्याचे सेवन करा. कृपया, अति प्रमाणामध्ये पाणी पीऊ नका त्यामुळे तुमच्या शरीरास हानी पोहोचेल. त्यामुळे, एका दिवसा मध्ये तुम्ही सुरक्षित रित्या पाणी पिण्याचे काय योग्य प्रमाण आहे? दिवसा मध्ये 4 ते 6 ग्लास पाणी पिणे योग्य ठरेल. तुम्ही तुमचे पाणी पिण्याचे प्रमाण योग्य आहे का ते तुमच्या लघवीच्या रंगावरून समजावून घेऊ शकता. जर तुमच्या लघवीचा रंग फिक्कट पिवळा किंवा पांढरट असेल तर तुम्ही योग्य प्रमाणामध्ये पाणी पीत आहात. आणि जर तुमच्या लघवीचा रंग गडद पिवळा असेल तर, तुम्हाला पाणी पिण्याचे प्रमाण वाढवणे गरजेचे आहे.

▪️ औषध वेळेवर घ्या :
तुमच्या डॉक्टरांनी सांगितल्या नुसार औषध वेळेवर घ्या. तुमच्या मूत्रपिंडाच्या समस्ये साठी तुम्ही घेत असलेल्या दीर्घकालीन उपचारां बद्दल सतर्क राहा, कारण ते हानिकारक असू शकते. शिवाय, आयबुप्रोफेन सारख्या वेदनाशामक औषधांचे जास्त प्रमाणातील डोस आणि लिथियम सारखे प्रीस्क्रीप्शन्स मोठ्या प्रमाणात व्यसनाधीनता निर्माण करू शकतात.

▪️ धूम्रपान टाळावे :
धुम्रपान करणे ही शरीरा मधील खूप सार्‍या अवयवांसाठी अतिशय खराब बातमी आहे, खासकरून मूत्रपिंडा साठी. विवीध अवयवांना होत असलेल्या रक्तप्रवाहा साठी देखील धूम्रपान खराब असते, त्यामध्ये मूत्रपिंडाचा देखील समावेश आहे. तुम्ही उच्च रक्तदाबासाठी घेत असलेल्या औषधांवर सुद्धा त्याचा विपरित परिणाम होत असतो. त्यामुळे, तुम्ही भूतकाळा मध्ये खूप वेळा प्रयत्न केलेले असतील तरी देखील तुम्हाला धूम्रपान पूर्णपणे बंद करणे अतिशय आवश्यक आहे.

▪️ आरोग्यपूर्ण आहाराचे सेवन :
सामान्यपणे, मूत्रपिंडाच्या आजारां मागे इतर वैद्यकीय समस्यांचे परिणाम कारणीभूत असतात. मधुमेह, उच्च रक्तदाब आणि रक्तवाहिन्या व हृदया संबंधी चे विकार यांसारखे आजार या वैद्यकीय समस्यां मध्ये समाविष्ट असतात. त्यामुळे, या सारख्या आजारांवर नियंत्रण मिळवण्या साठी तुम्हाला आरोग्यपूर्ण आहाराची आवश्यकता असते. योग्य आहारामुळे तुम्हाला योग्य वजन राखण्या बरोबरच योग्य रक्तदाब राखण्यास मदत होते. मधुमेह आणि रक्तदाबावर उपचार करून, तुम्ही तुमचे मुत्रपिंड आरोग्यपूर्ण ठेऊ शकता.

▪️ निष्कर्ष:
तुमच्या मूत्रपिंडाला आरोग्यदायी ठेवण्याचा प्राथमिक मार्ग म्हणजे तुमच्या संपूर्ण शरीराची योग्य काळजी घेणे. दारू पिणे, धूम्रपान करणे यासारख्या विषारी सवयीं पासून दूर रहाणे आणि यामुळे तुमच्या मूत्रपिंडावर कोणत्याही प्रकारचा ताण येणार नाही. जर तुम्हाला कोणत्याही प्रकारची मूत्रपिंडा संबंधित समस्या असेल तर डॉक्टरांचे समुपदेशन आवश्य घ्या.

संबंधित पोस्ट