VishwaRaj

डॉ. रोहित चकोर

डॉ. रोहित चकोर
10
ऑर्थोपेडिक
एम बी बी एस, डी एन बी

डॉ. रोहित चाकोर हे अनुभवी ऑर्थोपेडीक सर्जन आहेत. त्यांनी मिनिमली इनव्हॅसीव सर्जरी मध्ये स्पेशलायझेशन केलेले आहे, तसेच अर्थ्रोप्लास्टी आणि अर्थ्रोस्कोपी मधील आधुनिक टेक्निक्स मध्ये त्यांनी जर्मनी मधुन ट्रेनिंग घेतलेले आहे. इनामदार हॉस्पिटल मध्ये ते ऑर्थोपेडिक्स आणि जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी मध्ये कन्सल्टंट म्हणून काम करत आहेत, याच बरोबर पुण्यामधील बऱ्याच नामांकित हॉस्पिटल्स मध्ये ते पॅनल कन्सल्टंट म्हणून कार्यरत आहेत. डॉ. रोहित हे सर्व प्रकारच्या फ्रॅक्चर्स वर उपचार करण्या मध्ये निष्णात आहेत ज्यामध्ये कॉम्प्लेक्स फ्रॅक्चर, स्पोर्ट इंज्युरी आणि जॉईंट प्रॉब्लेम्स यांचा देखील समावेश आहे.
पुण्या मधील सर्वात नामांकित आणि सीनियर आर्थोपेडिक सर्जन्स कडुन त्यांनी ट्रेनिंग घेतलेले आहे, त्यांना डिफॉर्मिटी करेक्शन, जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी, स्पोर्ट इंजुरीज, अर्थ्रोस्कोपी त्याचबरोबर पेडियाट्रिक ऑर्थोपेडिक्स यांमध्ये खूप मोठा अनुभव आहे. मागील 8 वर्षांपासून ऑर्थोपेडिक प्रॅक्टिस करत असताना, त्यांनी यशस्वीपणे असंख्य शस्त्रक्रिया केल्या आहेत आणि त्यांच्या रूग्णांवर व्यवस्थित उपचार केले आहेत.

युरोप मधील आर्थोपेडिक चे सर्वोत्तम सेंटर असलेल्या जर्मनी, मुनीच येथील ओ सी एम क्लिनिक मध्ये त्यांनी ट्रेनिंग घेतलेले आहे, येथे जॉइंट रिप्लेसमेंट मधील मिनीमली इनव्हॅसीव अॅप्रोच ( ओ सी एम अॅप्रोच ) ही आधुनिक टेक्निक तयार केलेली आहे. त्यांनी मिनीमली इनव्हॅसीव अॅप्रोच वापरून असंख्य शस्त्रक्रिया या मोठ्या प्रमाणात यश संपादन करून रुग्णांवर केलेल्या आहेत. शैक्षणिक दृष्ट्या देखील ते परिपूर्ण आहेत आणि अंडर ग्रॅज्युएट व ग्रॅज्युएट विद्यार्थी तसेच प्यारा क्लिनिकल स्टाफ यांना ऑर्थोपेडिक चे शिक्षण देण्यासाठी असिस्टंट प्रोफेसर म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी भारता मध्ये ऑर्थोपेडिक्स वर बरेच वर्कशॉप आणि बऱ्याच कॉन्फरन्स अटेंड केलेल्या आहेत आणि ते महाराष्ट्र ऑर्थोपेडिक असोसिएशनचे लाईफ मेंबर आहेत.
त्यांनी बायलॅटरल टोटल नी अर्थ्रोप्लास्टी इन अ सिंगल सिटिंग या विषयावर रिसर्च थिसिस केलेला आहे आणि हे काम त्यांनी जरनल मध्ये प्रकाशित केलेले आहे. अजुन त्यांची बरीच रिसर्च पब्लिकेशन्स यायची आहेत कारण त्यांचे काम रिसर्च आणि पब्लिकेशन्स च्या दिशेने चालु आहे.

🔹शिक्षण :

▪️एम बी बी एस
▪️डी एन बी ऑर्थोपेडिक सर्जरी
▪️क्लिनिकल असिस्टंट फेलोशीप
▪️क्लिनिकल रिसर्च फेलोशीप

🔹पूर्वीचा आणि सध्याचा अनुभव :

▪️सिनिअर रेसिडेन्सी इन ऑर्थोपेडीक सर्जरी – श्रीमती काशीबाई नवले मेडिकल कॉलेज आणि जनरल हॉस्पिटल, पुणे.
▪️पॅनल कन्सल्टंट ऍट –
▪️इनलॅक्स अँड बुद्रानी हॉस्पिटल
▪️नोबेल हॉस्पिटल
▪️रुबी हॉल क्लिनिक
▪️सह्याद्री हॉस्पिटल, पुणे
▪️कन्सल्टंट इन ऑर्थोपेडीक्स ऍट विश्वराज हॉस्पिटल
▪️कन्सल्टंट इन ऑर्थोपेडीक्स ऍट द बोन अँड जॉईंट क्लिनिक पुणे
▪️कन्सल्टंट इन ऑर्थोपेडीक्स ऍट मनिपाल (कोलंबीया एशिया ) हॉस्पिटल, पुणे.
▪️कन्सल्टंट इन ऑर्थोपेडीक्स ऍट इनामदार हॉस्पिटल, पुणे
▪️ असोसिएट प्रोफेसर इन डिपार्टमेंट ऑफ ऑर्थोपेडीक्स, – बी. ए. व्ही. एम. सी., पुणे.
▪️असिस्टंट प्रोफेसर इन डिपार्टमेंट ऑफ ऑर्थोपेडीक्स, –
श्रीमती काशीबाई नवले मेडिकल कॉलेज आणि जनरल हॉस्पिटल, पुणे.

🔹रिसर्च :

▪️रिसर्च थिसिस ऑन ” अ स्टडी ऑफ सेफ्टी अँड इफीकॅसी ऑफ सायमलटेनिअस बायलॅटरल टोटल नी अर्थ्रोप्लास्टी इन सिंगल सिटिंग ऍट अ टेरीटरी केअर सेंटर.
▪️रिसर्च ऑन ” ऍन्टेरोलॅटरल मिनिमली इनव्हॅसीव सर्जरी ( ए एल एम आय एस ) अॅप्रोच फॉर बायपोलर हेमीअर्थ्रोप्लास्टी “.
▪️पब्लिशड आर्टिकल्स ऑन ‘सेफ्टी ऑफ सायमलटेनिअस बायलॅटरल टोटल नी अर्थ्रोप्लास्टी इन सिंगल सिटिंग इन द स्कॉलर्स ‘ जरनल ऑफ मेडिकल सायन्स ; ‘इफीकॅसी ऑफ सायमलटेनिअस बायलॅटरल टोटल नी अर्थ्रोप्लास्टी इन सिंगल सिटिंग’ इन द ग्लोबल जरनल ऑफ रिसर्च अँड ऍनालिसीस.
▪️रिसर्च वर्क ऑन मिनिमली इनव्हॅसीव हिप अॅप्रोच फॉर बायपोलर हिप रिप्लेसमेंट.